अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » स्वायत्त संस्थेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा – प्रा. डॉ. दशरथ सगरे

स्वायत्त संस्थेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा – प्रा. डॉ. दशरथ सगरे

यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे इंजिनिअरिंग आणि एमबीए प्रवेश नोंदणीला प्रारंभ

स्वायत्त संस्थेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा – प्रा. डॉ. दशरथ सगरे

 शासनमान्य अधिकृत सुविधा केंद्र यशोदा मध्ये उपलब्ध, विद्यार्थ्यांना प्रवेशा संबंधीच्या सर्व सुविधा मिळणार

सातारा : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (CAP) सुरुवात झाली असून, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा (Autonomous Institute) येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीसह मार्गदर्शनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Cell) आणि संबंधित प्रवेश प्राधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची मुदत लक्षात घेऊन 12 जुलै पर्यंत अर्ज नोंदवावेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

यशोदा टेक्निकल कॅम्पस हे स्वायत्त (Autonomous) संस्थेचा दर्जा प्राप्त संस्थान असून, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, आधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, संशोधन, नवोपक्रम, उत्कृष्ट प्लेसमेंट आणि जागतिक दर्जाच्या कौशल्य विकास उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची पहिली पसंती बनले आहे. अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी, पॉलिटेक्निक, बीबीए, बीसीए, एमसीए आणि एमबीए अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा येथे उपलब्ध आहे.

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्ता यादी, प्राधान्यक्रम भरणे तसेच प्रवेश फेऱ्यांबाबत विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये विशेष प्रवेश मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला आहे. अनुभवी प्राध्यापक आणि समुपदेशक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सहाय्य करत आहेत.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी सांगितले की, “यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवून देणे हेच उद्दिष्ट नसून त्यांना जागतिक स्तरावरील करिअरसाठी सक्षम बनविणे हे आमचे ध्येय आहे. उद्योगाभिमुख शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि उत्कृष्ट प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी यशोदा टेक्निकल कॅम्पसची निवड करावी.”

संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज नोंदणी पूर्ण करावी. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संस्थेने विशेष समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार योग्य अभ्यासक्रम निवडण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही दिले जात आहे.”

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल स्मार्ट क्लासरूम, संशोधन सुविधा, उद्योग-शैक्षणिक सहकार्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उत्कृष्ट प्लेसमेंट, स्टार्टअप आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन, तसेच जपानी, जर्मन आणि फ्रेंच भाषांचे प्रशिक्षण अशा अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये उच्च वेतनाच्या नोकऱ्या मिळवत आहेत.

प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती, मार्गदर्शन आणि ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थी व पालकांनी यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा संस्थेच्या प्रवेश मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट करिअर आणि उज्ज्वल भविष्यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पस हा विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket