विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्तीसाठी अटल वचनबद्ध राहावे: याशनि नागराजन
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये दोन दिवसीय करिअर मेळाव्याची सांगता
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये यश संपादन करण्यासाठी आणि आयुष्यामध्ये करिअरची उज्वल दिशा साधण्यासाठी अटल वचनबद्ध राहावे, कोणतेही यश संपादन करण्यासाठी कुशल एकाग्रता आपल्या अंगी बाळगावी, तसेच देशाच्या जडणघडणीमध्ये आपले योगदान देण्यासाठी सदैव तत्पर राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनि नागराजन यांनी यावेळी बोलताना केले.
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये दोन दिवसीय करिअर मिळावे चे आयोजन करण्यात आले होते. या करियर मेळाव्याच्या दुसऱ्या दिवसाच्या उद्घाटन प्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यशोदा टेक्निकल कॅम्पस चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरचा करिअर मेळावा संपन्न झाला. डॉ. अमोल डोंबाळे, श्रीमती प्रभावती कोळेकर हे देखील यावेळी उपस्थित होते.
दोन दिवशी या करिअर मेव्यामध्ये नववीपासून बारावी परीक्षा विद्यार्थ्यांना शालेय जीवनानंतर उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधी, तसेच व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणातील घडणाऱ्या बदलांच्या आधारावर विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो विद्यार्थ्यांनी सदरच्या करिअर मेळाव्यामध्ये उपस्थिती दाखवली. सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या करिअर मेळाव्यामध्ये आपला सहभाग नोंदवला.
कशाने नागराजन यांनी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये आयोजित या मेळाव्यात बोलताना विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर सहभागासाठी विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना प्रा. दशरथ सगरे म्हणाले विद्यार्थ्यांचे शालेय जीवनामध्ये सचोटीला आणि शिस्तीला फार महत्त्व आहे विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय प्रणावे शिस्तप्रिय विद्यार्थीच आपली शारीरिक मानसिक आणि शैक्षणिक प्रगती साध्य करू शकतो. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी न डगमगता शिक्षण घेत राहावे आणि आपल्या शिक्षकांच्या प्रती आई-वडिलांच्या प्रती नेहमी आदरभाव मनी बाळगावा असेही त्यांनी आवाहन केले.
दोन दिवसीय या करियर मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणातील करिअरच्या संधी विषयी विविध तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले, त्यासोबतच करिअर मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सातारा सह परिसरातील विविध शाळातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी करिअर मार्गदर्शन मेळाव्यासोबतच यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, आर्किटेक्चर, बीबीए बीसीए आधी विभागांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक प्रगतीचे आणि प्रयोगशाळांचे निरसन केले.