यशोदाच्या एमसीए विभागाचे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ परीक्षांमध्ये चमकले
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या एमसीए विभागाचे शिवाजी विद्यापीठ परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. . यशोदा टेकनिकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत उत्तम गुण संपादन केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी झालेल्या सम सत्रांच्या परीक्षांमध्ये एमसीए विभागातील कु. प्रज्ञा माने हिने 80 टक्के गुण संपादन करत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. कु. साक्षी लाहोटे हिने 78 टक्के गुण संपादन केले, तर कु. श्रुती कोथंबिरे हिला ७७ टक्के गुण मिळाले, या दोघींनी अनुक्रमे महाविद्यालयात द्वितीय आणि तृतीय क्रमांक वरती आपले स्थान निश्चित केले.
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये एमसीए हा अभ्यासक्रम सन 2011 पासून सुरू आहे, इथून पदवी संपादन केलेली विद्यार्थी देश विदेशातील विविध कंपन्यांमध्ये आपली सेवा बजावत आहेत. तसेच एमसीए पास झालेले विद्यार्थी हे उद्योजक देखील बनलेले आहेत. करिअरच्या अनेक दिशा उपलब्ध करून देणारा एमसीए अभ्यासक्रम असल्यामुळे तो विद्यार्थ्यांच्या मध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. असे एमसीए विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्मिता पाटील यांनी सांगितले.
चालू शैक्षणिक वर्षात देखील यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये एमसीए साठी प्रवेश क्षमता ही वाढवण्यात आली आहे. संगणकाच्या क्रांतीसोबतच त्यामधील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील उच्चविद्याभूषित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळा, तसेच उत्तम शैक्षणिक वातावरण यामुळे एमसीएच्या प्रवेशासाठी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पस ला प्रथम मागणी आहे. शैक्षणिक वर्ष 2024,25 साठी एमसीए विभागाचे प्रवेश क्षमता 180 इतक्या जागांची असून, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया संदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची देखील निर्मिती करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासली पाहिजे
चालू शैक्षणिक वर्षात यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये एमसीए साठी प्रवेश क्षमता ही वाढवण्यात आली आहे. संगणक शास्त्रातील अमुलाग्र बदलांमुळे, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी निर्माण करून देणारा कोर्स म्हणून एमसी अभ्यासक्रम नावारूपाला आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यशोदा इन्स्टिट्यूट सदैव कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबतच संशोधन कार्यासाठी देखील स्वतःला कार्यरत ठेवलं पाहिजे.
प्रा.अजिंक्य सगरे, उपाध्यक्ष- यशोदा इन्स्टिट्यूट सातारा
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्राध्यापका अजिंक्य सगरे, यशोदा टेक्निकल कॅम्पस चे संचालक, सहसंचालक, कुलसचिव, विभागप्रमुख, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.