राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत गौरीशंकर फार्मसीचे विद्यार्थी चमकले
लिंब – माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च म्हसवड या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील अंतिम वर्ष बी फार्मसी मध्ये शिकत असलेली दिव्या वेळेकर , अमृत भुसारी यांनी उपविजेते पद मिळवले या स्पर्धेत राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालयातील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.योगेश गुरव एम फार्मसी चे विभाग प्रमुख डॉ.धैर्यशील घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, कायदेशीर मॅनेजर रवी जगताप यांनी अभिनंदन केले.
