अमेरिकेत आयुर्वेदाचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रकृती हेल्थ रिसॉर्ट सातारा येते सातारकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट
सातारा प्रतिनिधी :प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य हेल्थ रिसॉर्ट आहे. आयुर्वेद तज्ञ वैद्य सुयोग दांडेकर यांनी 2001 मध्ये या केंद्राची स्थापना केली आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात कास रोड येते वसलेले आहे.रिसॉर्ट शरीर आणि आत्मा यांना आरोग्य आणि उपचारासाठी निसर्गाशी जोडते. निसर्गरम्य परिसरात आयुर्वेदाच्या प्राचीन विज्ञानातील सर्व उपचार आणि थेरपी देते या ठिकाणी उपलब्ध असून रिसॉर्टच्या सेवा अनुभवी आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स, तंत्रज्ञ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या निपुणतेवर आधारित आहेत. निवासासह संपूर्ण पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहेत.
प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट, कास पठार, सातारा महाराष्ट्र हे जन्मतारीख आयुर्वेदाच्या विशिष्टतेसह उपचारांसाठी ओळखले जाते. हेल्थ रिसॉर्ट गेल्या 24 वर्षांपासून यशस्वीरित्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या, आजार आणि संतुलित निरोगी जीवनासाठी आयुर्वेदिक आणि समग्र उपचार प्रदान करते. वैद्य सुयोग दांडेकर, डॉक्टर अथर्व दांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये आयुर्वेदामध्ये सातारा जिल्ह्याचे नाव जगभर होत आहे. अनेक नामांकित सेलिब्रिटी, सर्वसामान्य लोक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा येथे भेट देत असतात.
