Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला पुस्तक भेट उपक्रम स्तुत्य :- दिपक पवार

विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला पुस्तक भेट उपक्रम स्तुत्य :- दिपक पवार

विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला पुस्तक भेट उपक्रम स्तुत्य :- दिपक पवार

दक्षिण तांबवे शाळेत वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट उपक्रम

तांबवे :- मोबाईल, टीव्ही या मनोरंजनच्या साहित्यामुळे आजची पिढी, विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहे. मुलांच्यात वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाढदिवसाला पुस्तक भेट देणे हा दक्षिण तांबवे शाळेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन वडगाव हवेली कन्या शाळेचे मुख्याध्यापक दिपक पवार यांनी केले.  

दक्षिण तांबवे (ता. कराड) येथील जिल्हा परिषद शाळेत ज्ञानेश्वरी विशाल पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त शाळेस पुस्तक भेट देण्यात आली. यावेळी यशवंत संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गजानन देशमुख, मुख्याध्यापक आबासो साठे, सतीश सोनवणे, मनीषा साठे, सीमा देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मोगरे, पत्रकार विशाल पाटील यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते 

 आबासो साठे म्हणाले, विद्यार्थ्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यासाठी त्यांनी नवनवीन पुस्तके घ्यावीत. आपण शाळेत गेल्यानंतर किमान त्यांना पुस्तकाची नावे माहीत होऊन एखादं तरी त्याने पुस्तक वाचावे. यासाठी आम्ही वाढदिवसाला शाळेस पुस्तक भेट असा उपक्रम राबवला असून पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन पाचगणी प्रतिनिधी-न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता पहिली

Live Cricket