Home » ठळक बातम्या » वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेसाठी संघर्ष नायक पुरुषोत्तम जाधव यांनी रणशिंग फुकले

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेसाठी संघर्ष नायक पुरुषोत्तम जाधव यांनी रणशिंग फुकले 

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेसाठी संघर्ष नायक पुरुषोत्तम जाधव यांनी रणशिंग फुकले 

जनसंवाद यात्रेला मोठा प्रतिसाद

श्रीक्षेत्र महाबळेश्वर ते राजमाता अहिल्यादेवी पुतळा चौक लोणंद असा 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2024 जनसंवाद यात्रेचा प्रवास 

प्रतिनिधी :शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र महाबळेश्वर येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली असून मतदारसंघातील परिवर्तनासाठी नऊ दिवस ही परिवर्तन यात्रा सुरूच राहणार आहे.वाई -खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात आता बदल निश्चित असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येऊन घराणेशाही विरोधात लढा दिला पाहिजे तरच आपल्या मतदारसंघाचा आणखी विकास होईल. मतदार संघात नागरिक परिवर्तनासाठी सज्ज झाले असून आता या मतदारसंघावर भगवा नक्की फडकेल ,असा विश्वास शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला.

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर महाबळेश्वर प्रतापगड येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात केली, यावेळी ते बोलत होते. 

यावेळी संजयसिंह देशमुख वाई विधानसभा संघटक, वनिताताई जाधव उपजिल्हा संघटिका महिला आघाडी , तसेच संजय शेलार महाबळेश्वर तालुकाप्रमुख पूर्व, संभाजी भिलारे महाबळेश्वर तालुकाप्रमुख पश्चिम ,विजय नायडू महाबळेश्वर शहर प्रमुख ,राहुल शिंदे पाचगणी शहर प्रमुख, भूषण शिंदे खंडाळा तालुकाप्रमुख ,ज्ञानेश्वर भांडे शिरवळ शहर प्रमुख ,भानुदास जाधव संचालक खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना, चंदू गुरुजी ज्येष्ठ शिवसैनिक तथा मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना वाई विधानसभा निमंत्रित सदस्य, तसेच सचिन आवारे ,मंगेश खंडागळे, नारायण शेलार, गोपाळ शेलार, मारुती सपकाळ, अविनाश ढेबे सरपंच ,बंडा पुजारी, निवृत्ती जाधव सरपंच, संदीप शेलार ,राजेश सपकाळ, सागर सपकाळ ,सयाजी शेलार सरपंच, राजाराम शेलार, सविता पुजारी ,प्रसाद ननवरे ,नितीन शेलार ,ऋषिकेश राजपुरे ,विवेक पंडित ,महाबळेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी क्षेत्र महाबळेश्वर येथे झालेल्या सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव म्हणाले, एकाच घराण्याने अनेक वर्षे लोकसभा, विधानसभा , जिल्हा बँक अध्यक्षपद, साखर कारखाने, बाजार समिती, सरपंच परिषद अध्यक्ष, सरपंच अशा अनेक सत्ता स्वतःकडे ठेवूनही मतदारसंघाचा मात्र विकास ते करू शकले नाहीत. आता या विभागाच्या विकासासाठी आता परिवर्तन घडवण्याची गरज निर्माण झाली आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून पुढील १० दिवस महाबळेश्वर ,वाई व खंडाळा या तीन तालुक्यातील सर्व गावात थेट मतदारांशी भेटून आवाहन करणार आहे.महाबळेश्वर येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात केली, यावेळी ते बोलत होते. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती

Post Views: 13 छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय

Live Cricket