Post Views: 74
कट्टर शिवसैनिक प्रभाकर जाधव यांचे निधन
महाबळेश्वर -आंब्रळ, ता. महाबळेश्वर येथील प्रभाकर शंकर जाधव (वय ७९) यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते अण्णा या नावाने परिचित होते. महाबळेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित जाधव यांचे ते चुलते होत. सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दिवंगत मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी विचारसरणीमुळे ते शिवसेनेकडे ओढले गेले महाबळेश्वर तालुक्यामध्ये कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती होती.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, मुली, सून नातवंड असा परिवार आहे. उत्तर कार्य विधी बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी आंब्रळ येथे होणार आहे.
