प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर प्रथमच आमदार शशिकांत शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
सातारा -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्याची धुरा सातारचे सुपुत्र आमदार शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपविलेली आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच त्यानीं सातारा जिल्ह्यात आगमन केले.
सन्मान सोहळ्यात पुणे ते शिरवळ परिसरातील ज्येष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते, महिला भगिनी, विविध विभागांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या डोळ्यांतील विश्वास, प्रेम आणि अपेक्षा मी जाणून घेतल्या आणि तोच विश्वास पुढे नेत मी प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी जनतेला दिले.
