म्हसवे गटात राष्ट्रवादी उमेदवारांसाठी आ.शशिकांत शिंदे यांचा झंजावती प्रचार दौरा
जिल्हा परिषद गट म्हसवे गटातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.संदीप सर्जेराव पवार,पंचायत समिती खर्शी–बारामुरे गणातील उमेदवार श्री.विठ्ठल गुलाबराव गोळे तसेच पंचायत समिती म्हसवे गणातील उमेदवार सौ.शिल्पा मिलिंद शिंदे यांच्या प्रचारार्थ अंबेघर, हातगेघर, विवर, पानस, टोंपेवाडी, वहागांव, रांजणी व महू या गावांना भेट देऊन आ.शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ झंजावती दौरा केला. यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उमेदवारासह आमदार शशिकांत शिंदे यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत स्थानिक प्रश्न,सुरू असलेली विकासकामे व भविष्यातील योजनांवर सविस्तर चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या या सक्षम व विकासाभिमुख उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केले.
सर्व गावांतील ग्रामस्थांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व दाखवलेला विश्वास पाहून विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असल्याचे उमेदवारांनी व्यक्त केले.




