राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर, पुढचे तीन दिवस सतर्कतेचे
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरलेला असतानाच, हवामानाचा अंदाज अधिकच गंभीर बनला आहे. आज, 22 मे रोजीही राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहणार असून, विशेषतः कोकण, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, काही ठिकाणी वीज कोसळून जीवितहानी झाल्याच्याही घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
हवामान विभागाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.




