अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कर्तव्यनिष्ठेची पोचपावती! सातारा एलसीबीचे ‘रत्न’ राजू मुलाणी यांचा राज्यस्तरावर गौरव

कर्तव्यनिष्ठेची पोचपावती! सातारा एलसीबीचे ‘रत्न’ राजू मुलाणी यांचा राज्यस्तरावर गौरव

कर्तव्यनिष्ठेची पोचपावती! सातारा एलसीबीचे ‘रत्न’ राजू मुलाणी यांचा राज्यस्तरावर गौरव

कर्तव्याचा ‘खाकी’ सन्मान! सातारा LCB चे राजू मुलाणी यांना मानाचे महासंचालक पदक जाहीर

भुईंज ( महेंद्रआबा जाधव )-पोलीस दलात काम करताना केवळ ड्युटी न करता, समाजहितासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या पोलीसाचा जेव्हा गौरव होतो, तेव्हा संपूर्ण विभागाची मान अभिमानाने उंचावते. सातारा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) धडाडीचे अंमलदार राजू मुलाणी यांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर झाले असून, त्यांच्या या यशाने सातारा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 ​अष्टपैलू कामगिरीची पावती

राजू मुलाणी यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांनी तांत्रिक विश्लेषण, बातमीदारांचे जाळे आणि तपासातील चिकाटी या जोरावर अनेक अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. दरोडा, चोरी, खुनाचे गुन्हे असोत वा अवैध धंद्यांविरुद्धची मोहीम, मुलाणी यांनी नेहमीच ‘ऑन फिल्ड’ राहून आपली चमक दाखवली आहे.

चिकाटी आणि प्रामाणिकपणाचे फळ

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह हे पोलीस दलातील अत्यंत प्रतिष्ठेचे पदक मानले जाते. सलग पाच वर्षे निष्कलंक सेवा आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांना हे पदक देऊन गौरविण्यात येते. राजू मुलाणी यांच्या कामातील सातत्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला आहे.

मुलाणी यांना हे पदक जाहीर झाल्याबद्दल सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी विश्वजित घोडके, सर सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. केवळ पोलीस विभागच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेतूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राजू मुलाणी यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या प्रामाणिक कष्टाचे आणि खाकी वर्दीप्रती असलेल्या निष्ठेचे फळ आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket