महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन तर्फे राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी -आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व बुलढाणा अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन वक्तृत्व स्पर्धेचे १) सहकार काल, आज व उदया २) महाराष्ट्राचे अर्थकारणात सहकारी पतसंस्था चळवळीचे योगदान ३) महाराष्ट्राच्या बेरोजगारी निर्मुलनात पतसंस्था एक सक्षम पर्याय, असे विषय आहेत. तसेच राज्यस्तरीय महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजीत केल्या असून त्यांचे १) शेतकरी आत्महात्या रोखण्यात सहकारी पतसंस्थांची उपयुक्तता २) महाराष्ट्राला आपेक्षीत सहकार चळवळ/सहकार महर्षीच्या संकल्पनेतील सहकार चळवळ ३) भविष्यातील समृध्द सहकार चळवळीसाठी युवा नेतृत्वाची गरज ४) सहकार संवर्धनासाठी सहकार खात्याकडून अपेक्षा ५) बुलढाणा अर्बन बँकेची यशोगाथा असे विषय आहेत. विजेत्यांना वरील स्पर्धेकरीता प्रथम क्रमांकास रू. ७,०००/-, दिव्तीय क्रमांकास रू. ५,०००/-, तृतीय क्रमांकास रू. ३,०००/-, उत्तेजनार्थ क्रमांकास रू. २,०००/- याचेबरोबर प्रत्येक विजेत्यास प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी व स्पर्धेचे नियम माहितीसाठी सहकार भुषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सातारा धन्वंतरी भवन, ९३, शनिवार पेठ, सातारा येथे संपर्क साधावा असे आवाहन धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक डॉ. रविंद्र नामदेव भोसले व सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनेचे संचालक डॉ. कांत नारायण फडतरे यांनी केले आहे.
