अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » ड्राय डे दिवशी अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ड्राय डे दिवशी अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ड्राय डे दिवशी अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सातारा:- निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा या कार्यालयाने 15 ऑगसट रोजी मौजे नवीन एम.आय.डी.सी. चंदननगर, कोडोली ता. जि. सातारा येथे गोवा राज्यात निर्मित व फक्त गोवा राज्यात विक्रीस अनुमती असलेल्या मद्यावर कारवाई करून दोन आरोपींच्या ताब्यातून सात लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाईमध्ये मिळालेल्या माहितीनुसार वरील गुन्हयातील आरोपींनी अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे काही बॉक्स हॉटेल मोगरा, नागठाणे येथे दिले असल्याचे सांगतले. नागठाणे, ता. जि. सातारा येथे तपासणी केली असता सदर ठिकाणी वरील अवैध गोवा बनावटीचे मॅकडॉल नं. १ विदेशी मद्याच्या १८० मि.लीच्या २७ बाटल्या व विनावाहतूक पासाचे मद्य आढळून आल्याने सदर अनुज्ञप्ती विरुद्ध महाराष्ट्र विदेशी मद्य नियम १९५३ चे विविध कलमान्वये विभागीय विसंगती प्रकरण नोंद केले आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा कार्यालयाने केली. सदर कारवाईमध्ये निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, विजय मरोड, सहा. दु.नि. नितीन जाधव, जवान अजित रसाळ, रमेश भुजबळ, विनोंद हिंगणे, अमित क्षीरसागर, अजित घाडगे, बाळासो पाचुंदे, आबासाहेब जानकर, आप्पासो काळे, किरण जंगम यांनी भाग घेतला सदर गुन्ह्याच्या पुढील तपास अजय पाटील, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा हे करीत आहेत.

जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयाचे देण्यात यावी किंवा या विभागाचे टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व व्हॉटस अप क्रमांक ८४२२००११३३ वर कळविण्यात यावी. बातमीदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket