Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राज्यातील हजारो बार बंद

राज्यातील हजारो बार बंद

राज्यातील हजारो बार बंद

सातारा -मद्य विक्रीवर वाढीव दहा टक्के व्हॅट कराच्या आणि अन्य अन्यायकारक निर्णयांच्या विरोधात व निषेधार्थ परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीने आज सोमवारी, १४ जुलै रोजी राज्यव्यापी परमिट बार बंद आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यासह राज्यातील हजारो बार बंद ठेवण्यात आल्याने राज्यातील लाखो तळीराम वा मद्यप्रेमींची गैरसोय झाली. दुसरीकडे, राज्य शासनाला मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या दैनिक महसुलावर पाणी सोडावे लागले.

परमिट रूम आणि बिअर बार व्यवसायिकांवर शासनाने लादलेल्या अन्यायकारक व्हॅट करवाढी विरोधात आज  राज्यातील कमी अधिक २४ हजार परमिट बार सहभागी झाल्याचा दावा संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

यामुळे राज्य शासनाला दररोज मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाला मुकावे लागले. याशिवाय राज्यातील लाखो मध्यप्रेमिंची गैरसोय झाली. तसेच परमिट बार वर अवलंबून असलेल्या किराणा, बाटलीबंद पाणी व्यावसायिक, शीत पेय ( कोल्ड्रिंक) ठोक विक्रेते, पाकीट बंद स्नॅक्स व्यावसायिक, मटण- चिकन विक्रेते यांच्या दैनंदिन व्यवसाय व उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला. राज्यातील २४ हजार बारमध्ये कार्यरत लाखो, कर्मचारी, स्वयंपाकी, वेटर यांनाही आर्थिक फटका बसला.

परमिट रूममधील मद्य विक्रीवर १० टक्क्यांनी वाढवलेला व्हॅट रद्द करण्यात यावा, मागणी आहे. तसेच, शासनाने ‘फर्स्ट पॉईंट टॅक्स’ लागू करावा आणि परमिट रूम नूतनीकरणाची वाढवलेली फी कमी करावी अशी मागणी आहे . या वाढीमुळे परवानाधारकांना मोठा आर्थिक फटका बसत असून ग्राहकांवरही अतिरिक्त दराचा भार येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर–पांचगणी : युनेस्को डेक्कन ट्रॅप्स वारशाची शान

Post Views: 91 महाबळेश्वर–पांचगणी : युनेस्को डेक्कन ट्रॅप्स वारशाची शान सातारा -(अली मुजावर) सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर आणि

Live Cricket