Home » राज्य » शेत शिवार » मृदा तपासणीतून सातारा जिल्ह्यातील 467 गावांचा जमिन सुपिकता निर्देशांक तयार

मृदा तपासणीतून सातारा जिल्ह्यातील 467 गावांचा जमिन सुपिकता निर्देशांक तयार

मृदा तपासणीतून सातारा जिल्ह्यातील 467 गावांचा जमिन सुपिकता निर्देशांक तयार

सातारा :- शेतकऱ्यांच्या जमिनीचे आरोग्य जपून उत्पादन क्षमता वाढविण्याच्या उददेशाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा भाग्यश्री फरांदे यांचे मार्गदर्शनाखाली यांचे जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, सातारा कार्यालयामार्फत राष्ट्रिय कृषी विकास योजना जमीन आरोग्य व सुपिकता निर्देशांक कार्यक्रम अंतर्गत व इतर संलग्न योजनांमधून मागील तीन वर्ष सन २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये तपासणी करण्यात आलेल्या साधारणतः ५५ हजार मृद नमुने तपासणीच्या आधारे एकूण ४६७ गावांचा गावनिहाय जमिन सुपिकता निर्देशांक तयार करण्यात आला आहे.

या निर्देशांकामध्ये सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्धता, जमिनीचा सामू व क्षारता यांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यात आले असून गावनिहाय जमिनीच्या सुपिकतेचे वास्तव चिञ समोर आले आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन करणे सोयाचे होणार आहे. तसेच जमीन सुपिकता निर्देशांकामुळे अनावश्यक रासायनिक खतांचा वापर कमी होउन उत्पादन खर्चात बचत, जमिनीचे आरोग्य सुधारणे, पीक उत्पादन व गुणवत्ता वाढ तसेच पर्यावरण पूरक शेतीला चालना मिळणर आहे. कृषी विभागाच्या विविध योजना, पोषण द्रव्ये व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीसाठी हा जमीन सुपिकता निर्देशांक महत्वाचा ठरणार आहे.

या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या जमीन सुपिकता निर्देशांकाची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मिळणार आहे. तसेच अधिक माहितीकरिता जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी, सातारा, संबंधित तालुक्याचे मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व संबंधित गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधवा. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket