Home » राज्य » शिक्षण » मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पालकांच्या आणि मुलांच्या नात्यात संवादाची गरज- श्वेता घाडगे

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पालकांच्या आणि मुलांच्या नात्यात संवादाची गरज- श्वेता घाडगे

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी पालकांच्या आणि मुलांच्या नात्यात संवादाची गरज- श्वेता घाडगे

किकली येथे संवाद सत्र अतिशय उत्साहात साजरे 

पाचवड (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने कीकली गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (९ सप्टेंबर) संध्याकाळी सहा वाजता तेजोमय फाउंडेशनच्या अध्यक्षा श्वेता घाडगे यांचे मुलांच्या नात्यात संवाद कसा असावा याविषयी चर्चासत्र झाले. या कार्यक्रमास कीकली गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. 

      चर्चासत्रात दररोजच्या जीवनात आपण मुलांसोबत जसे वागतो त्याचा चांगला आणि वाईट परिणाम मुलांच्या मेंदू वरती होत असतो. लहानपणी मुलांच्या बाबतीत पालकांकडून घडलेल्या चांगल्या वाईट घटना मुलं मोठी झालीत तरी देखील त्यांच्या मेंदू मधून काढता येत नाहीत. त्याचा परिणाम भविष्यात मुलांना आणि पालकांना देखील भोगावा शून्य ते बारा हा वयोगटच मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा वयोगट आहे. भविष्यकाळात जर मुलांना उत्तम नागरिक म्हणून घडवायचे असेल तर नात्यात चांगला संवाद असल्याशिवाय हे शक्य नाही असे श्वेता घाडगे यांनी त्याचबरोबर मुलांचा मोबाईलचा वापर कमी कसा करावा. मुलं हट्ट करतात ,ऐकत नाहीत, मुलांच्या मध्ये एकाग्रता राहत नाही, मुलं खूप चंचल आहेत. अशा मुलांच्या भाव-भावना कशा हाताळायच्या हे प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून सांगण्यात आले. पालकांनी अतिशय उत्साहाने हे सत्र ऐकले. 

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा उद्योजक निखिल बाबर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सुयोग बाबर यांनी प्रास्ताविक केले तर आभार सर्व ग्रामस्थांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपुर पोलीसांची सुपर फास्ट कामगिरी २४ तासात सोने चोरीचा गुन्हा उघड, २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत रहिमतपुर पोलीस ठाणे

Live Cricket