श्रुती गोविंद भोसले हिचे सी.ए. परिक्षेत उत्तुंग यश
शिवथर. (सुनिल साबळे)दिवड ता.माण येथील गोविंद भोसले व्यवसाय सरकारी वकील त्यांची कु.श्रुती गोविंद भोसले हिने पहिल्याच प्रयत्नामध्ये सीए परीक्षा पास होऊन घवघवीत यश मिळवले. वडील व्यवसायाने वकील असून सुद्धा त्यांनी आपल्या मुलीला सीए करण्यासाठी प्रयत्न केले आणि या प्रयत्नाला मुलीने देखील त्याच पद्धतीने प्रतिसाद देत सीए होऊन बहुमान मिळवला. तिने यश संपादन केल्यानंतर विविध स्तरातून तसेच धनंजय गाडगीळ महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षक यांनी तिचे अभिनंदन केले.
श्रुती भोसले हिचे शालेय शिक्षण निर्मला कॉन्व्हेंट स्कुल, सातारा या ठिकाणी १ली ते १०वी पर्यंत झाले. ११वी ते M.Com हे शिक्षण डी.जी. कॉलेज, सातारा येथे झाले आहे. तिने १ली ते M.Com पर्यंत १३ बास्केट बॉल नॅशनल खेळलेली असून २ आंतरराष्ट्रीय बास्केट बॉलचे कॅम्प केलेले आहेत. तसेच ४ वेळा विद्यापीठ बास्केट बॉल खेळलेली आहे. तसेच अश्वमेघ ३ वेळा खेळली असून बास्केट बॉल खेळामध्ये १ सुवर्ण, ३ रौप्यपदक मिळवलेले आहेत. तिने सी.ए. चे शिक्षण रजनी क्लासेस, सातारचे राम कदम सर यांच्याकडे सुरु केले व सी.ए. साठी आवश्यक प्रशिक्षण सी.ए.चंद्रकांत माने, सी.ए. संतोष माने, सी.ए. विनोद माने, सी.ए. दिपा शिंदे/माने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले व सी.ए. परिक्षा उत्तीर्ण झाली. बास्केट बॉलसाठी कोच म्हणून नितेश दत्तात्रय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. डी.जी. कॉलेज, सातारा याठिकाणी शिकत असताना श्री. किशोर संकपाळ सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याकामी तिचे आई, वडील व भोसले कुटुंब यांनी प्रोत्साहन दिले. ती सी.ए. झाल्याबद्दल सर्व सामाजिक, राजकीय स्तरातून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.
