Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा संस्काराची खरी गरज-श्रीरंग काटेकर

शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा संस्काराची खरी गरज-श्रीरंग काटेकर

शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा संस्काराची खरी गरज-श्रीरंग काटेकर

गौरीशंकरच्या डॉ पी व्ही सुखात्मे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन

लिंब-शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असून त्यासाठी त्यांना क्रीडा संस्काराचे महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरतात असे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब.ता.जि सातारा येथील गौरीशंकर चे डॉ पी व्ही सुखात्मे इंग्लिश मिडियम स्कूल लिंब येथे दिनांक २७ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी स्कूलचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण,क्रीडा प्रमुख नितीन शिवथरे, अमित मडके, अविनाश सावंत, रूपाली मोरे, आरती चव्हाण,अश्विनी सवाखंडे, पल्लवी जाधव,कृतीका साळुंखे, निना जगताप आदी प्रमुख शिक्षक उपस्थित होते. श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की मन मेंदू आणि मनगटाच्या बळकटीसाठी क्रीडा स्पर्धेतील सहभाग हा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतो . त्याचप्रमाणे क्रीडांगणावरील सांघिक भावना भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त ठरते. शालेय क्रीडा सप्ताह मध्ये कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, क्रिकेट या मैदानी खेळाबरोबरच बुद्धिबळ, कॅरम,मल्लखांब स्पर्धांचे ही आयोजन केले आहे. क्रीडा सप्ताहाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. प्रारंभी क्रीडांगणाचे पूजन श्रीफळ वाढवून संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व आभार प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांनी मानले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा संस्काराची खरी गरज-श्रीरंग काटेकर

Post Views: 23 शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा संस्काराची खरी गरज-श्रीरंग काटेकर गौरीशंकरच्या डॉ पी व्ही सुखात्मे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये क्रीडा

Live Cricket