Home » राजकारण » धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे

धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे

धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )जावली तालुक्यातील धनगर समाजाचा मताधिक्य देण्याचा निर्धार सातारा- सातारा व जावली तालुक्यात अति दुर्गम, डोंगराळ भागात धनगर समाजातील लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. माझ्या मतदारसंघातील धनगर समाज असलेल्या प्रत्येक गावात डांबरी रस्ता पोहचला आहे. धनगर समाजाचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्राधान्य दिले असून आगामी काळात धनगर बांधवांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. 

सुरुची कार्यालय येथे सातारा- जावली मतदारसंघातील धनगर समाजबांधवानी आज आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. मतदारसंघातील संपूर्ण धनगर समाज आ. शिवेंद्रसिंहराजेंना विक्रमी मताधिक्य देऊन त्यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलेल, असा शब्द उपस्थित धनगर समाजबांधवानी आ. शिवेंद्रसिंहराजेंना दिला. यावेळी बाबुराव कोकरे, राजू कोकरे, प्रकाश शिंदे, नामदेव गोरे, राजू गोरे, जयराम काळे, कोंडीबा शिंदे, लक्ष्मण आखाडे, रघुनाथ अवकीरकर, संजय शेडगे, रामचंद्र अवकीरकर, काशिनाथ केंडे, विलास ढेबे, गणपत ढेबे, सुरेश गोरे, सुनील डोईफोडे, कोंडीबा केंडे, प्रकाश गोरे, दिनकर मेळाट, रवी जानकर यांच्यासह सर्व गावातील सरपंच, ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मतदारसंघातील विकासकामे करताना कधीही कसलाही दुजाभाव केला नाही आणि कधी करणारही नाही. धनगर समाजाच्या दुर्गम, डोंगराळ भागातील गावांमध्ये सर्व प्रकारची विकासकामे मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला आहे. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हे माहित आहे. आगामी काळात तुमच्या मागण्यांप्रमाणे उर्वरित कामे मार्गी लावू. विकासकामांच्या बाबतीत आपण कसलीही काळजी करू नये. या निवडणुकीत संपूर्ण धनगर समाज माझ्या पाठीशी आहे आणि आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे माझ्या विजयात आपला मोलाचा वाटा असेल, यात तिळमात्र शंका नाही. त्याचपद्धतीने आपण आपले पै- पाहुणे, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनाही कमळाला मतदान करण्यास सांगून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket