अतुल रामकृष्ण नाझरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवीन संकल्पनेतून शिल्प घेऊन येत आहेत. या शिल्पाचे सर्व संदर्भ रेफरन्स नुसार घेण्यात आले आहेत. उदाहरणार्थ छत्रपतींची मूर्ती ही लंडनमधील पोट्रेटच्या आधारे तयार करण्यात आली आहे सिंहासनावरील संदर्भ हे बखरी मधून व छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने इंग्रज अधिकारी हेन्री ओक्सिडेन यांनी वर्णन केले नुसार या सिंहासनाची निर्मिती केली आहे.
सिंहासन अष्टकोनी असून त्याच्या आठही बाजुला आठ सिंह आहे सिंहासनाच्या प्रभावळीवर याली चंद्र सूर्य मयूर ही चिन्हे आहेत सिंहासनाच्या बेसवर याली हत्ती चित्ता बैल घोडा राजहंस व कीर्तीमुख ही चिन्हे प्रामुख्याने आहेत सिंहासन मार्बल पावडर मध्ये तयार होणार असून सिंहासनावर सोन्याचा वर्ख आहे महाराजांची मुर्ती फोर कलर मध्ये असून मूर्तीवरील अभूषणे आहे आपण मेटलमध्ये तयार केली आहे.
सिंहासनाची उंची ३० इंच असून हे मार्बल पावडर मध्ये तयार होणार असून सिंहासनावर सोन्याचा वर्ख लावणार आहेत.
महाराजांची मुर्ती फोर कलर मध्ये येणार असून मूर्तीवर अभूषणे आहेत.चांदीमध्ये तयार करून त्यावर सोन्याचा मुलांमा देणार आहेत. हे शिल्प तयार करण्याचा उद्देश 2024 हे वर्ष हा राज्याभिषेक सोहळ्याचा ३५० पुर्ती वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत.
6 जुन रोजी गड दुर्ग रायगडावर ही मुर्ती रिलीज करीत आहे