Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शाहूनगर व सदरबजार भागासाठी कासचे पाणी देण्यासाठी विकास आराखडा लवकरात लवकर तयार करा: श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले

शाहूनगर व सदरबजार भागासाठी कासचे पाणी देण्यासाठी विकास आराखडा लवकरात लवकर तयार करा: श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले

शाहूनगर व सदरबजार भागासाठी कासचे पाणी देण्यासाठी विकास आराखडा लवकरात लवकर तयार करा: श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले 

सातारा -शाहूनगर भागामध्ये गेल्या सहा महिन्यापासून सतत विविध कारणांमुळे विस्कळीत पाणी पुरवठा होत होता. त्यामधील प्रमुख कारण म्हणजे महावितरण व जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वय. पंपिंग स्टेशन वरील लाईट जाण्यामुळे शाहूनगर भागातील चार भिंतीजवळील पाण्याच्या टाक्या भरत नव्हत्या, हेच कारण वारंवार जीवन प्राधिकरण कडून सांगितले जात होते . या समस्येवर जीवन प्राधिकरण व महावितरण च्या दोन्ही अधिकाऱ्यांची जलमंदिर येथे एकत्रित बैठक घेण्यात आली. यामध्ये एक्सप्रेस फिडर वरून लाईन देण्याचे व पंपिंग स्टेशनवर तात्काळ 200 के व्ही ए चा ट्रान्सफॉर्मर बसवून लाईट ची समस्या तात्काळ दूर करण्याची ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली .तसेच शाहूनगर व सदर बाजार या भागासाठी कास तलावाचे पाणी देण्याच्या बाबतीत विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या. 

     सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी उदयनराजे यांच्या सूचनेनुसार ऑगस्ट महिन्यात जीवन प्राधिकरण ला कासचे पाणी देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्या बाबत जीवन प्राधिकरण कडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नव्हते .

कास तलावाची उंची वाढवल्यामुळे सातारा शहराची लोकसंख्या चार लाख जरी झाली तरी कासचे पाणी सर्व शहर व हद्दवाढ भागामध्ये मिळू शकते तसेच कासच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरण ला खर्चही कमी येऊ शकतो, यासाठीच उदयनराजे यांनी शाहूनगर व सदर बाजार या भागांसाठी कास तलावाचे पाणी देण्यासाठी मुख्याधिकारी बापट यांना सुचित केले होते मात्र जीवन प्राधिकरण च्या चाल ढकलपणामुळे कोणतेही ठोस पाऊल उचलले नव्हते. जीवन प्राधिकरण व नगरपालिका यांच्यामध्ये समन्वय साधत नव्हता. 

 आज शाहूनगर मधील नागरिक विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात उदयनराजे यांच्याकडे गेले असता कासच्या पाण्यावर देखील चर्चा झाली त्यावेळी उदयनराजे यांनी लवकरात लवकर कास च्या पाण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना जीवन प्राधिकरण ला केल्या व जीवन प्राधिकरण ने देखील दोन महिन्याच्या आत विकास आराखडा सादर करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे लवकरच शाहूनगर व सदरबाजार भागासाठी कास चे पाणी मिळणार आहे. याबद्दल शाहूनगर वासी यांनी उदयनराजे यांची आभार मानले.

 याप्रसंगी शाहूनगर मधील समाजसेवक सागर भोसले, मुख्याधिकारी अभिजीत बापट, जीवन प्राधिकरण चे अधिकारी देशमुख व गडकरी मॅडम तसेच वीज वितरण कंपनीचे देशमुख साहेब व सहकारी तसेच शाहूनगर मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाचगणीत अभिवादन

Post Views: 99 महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाचगणीत अभिवादन पाचगणी – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Live Cricket