Home » राज्य » प्रशासकीय » श्री.शंकरराव चिकटूळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

श्री.शंकरराव चिकटूळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

श्री.शंकरराव चिकटूळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र शासनाचे राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी व गुणवंत कर्मचारी पुरस्कार कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला. कृषी महाविद्यालय पुणे येथील मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमांत महाबळेश्वर पंचायत समितीकडे एकोणवीस वर्षे सहा महिने व वाई पंचायत समितीकडे सध्या कार्यरत असणारे श्री. शंकरराव चिकटूळ ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचे नेते, ग्रामपंचायत अधिकारी संघांचे माझी अध्यक्ष व अभ्यासु नेतृत्व अशी ओळख असणारे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार यांचे शुभ हस्ते व मा. खा. मेधा कुलकर्णी, अभिनेत्री शिवाली परब, आ. शंकर गांडेकर, आ.बापुसाहेब पाठारे, अप्पर आयुक्त नितीन गाने, मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, यांचे प्रमुख उपस्थितीत राज्य स्तरीय आदर्श ग्रा.पं. अधिकारी पुरस्कार प्रदान करणेत आला.

श्री. शंकरराव विकटूळ नोव्हेंबर २००५ व्या बॅचचे प्रमुख शिलेदार व संघर्ष योद्धा असणारे व २००५ च्या बॅचचे नेतृत्व करणारे अशी ओळख मुळातच होतीच शिवाय यांनी २००५/२००६ च्या निर्मल ग्राम पुरस्कार पासून सुरुवात करून ग्रामपंचायतीना स्वच्छ ग्राम, स्मार्ट ग्राम, ISO ग्राम, दिनदयाळ पंचायत पुरस्कार, पर्यावरण ग्राम असे अनेक पुरस्कार ग्रामपंचायतींना प्राप्त करून देण्यात मोलाचा वाटा होता. पंचायत राज समितीने देखील दखल घेवून गौरव केला होता. तसेच सर्व ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करणे व अभ्यासू वृत्तीने करणे बरोबरच पदभार असणारी ग्रामपंचायत कायम आघाडीवर ठेवण्याची कसब असणारे श्री. चिकटूळ यांना वैयक्तिक जिल्हा स्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी विभागीय पुरस्कार, तसेच DRDO ने देखील दखल घेऊन सन्मानित केले आहे. सेवा काळात आत्तापर्यंत वैयक्तिक पातळीवर जवळपास ४० पेक्षा अधिक पुरस्कारांना गवसणी घालून शनिवार दि. ७ मार्च रोजी राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार देवून शासनाच्या वतीने गौरविण्यात आले.

सदर पुरस्कार श्री. चिकटूळ यांनी आई, पत्नी व मुलगी संस्कृती यांना समर्पित केल्याचे नमूद केले. सदर पुरस्कार महिला दिनाच्या पूर्व संध्येला पार पडला. याचे औचित्य साधून माता-भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यांवेळी पुणे व राज्यातील कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket