Home » देश » श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ६ जुलैला सातारा जिल्ह्यात आगमन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ६ जुलैला सातारा जिल्ह्यात आगमन 

वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ६ जुलैला सातारा जिल्ह्यात आगमन 

सालाबादप्रमाणे दि. २९ जून २०२४ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू होणार आहे. दि. ६ जुलै २०२४ रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून दि.११ जुलै २०२४ रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. शनिवार, दि. ६ जुलै रोजी नीरा पूल, सकाळचा विसावा नीरा पूल, दुपारचा नैवेद्य व निघण्याचे ठिकाण नीरा पूल, दुपारचा विसावा नीरा पूल, रात्रीचा मुक्काम लोणंद.रविवार, दि. ७ जुलै रोजी लोणंद येथे दिवसभर व रात्रीचा मुक्काम असेल, तर सोमवार, दि. ८ जुलै रोजी सकाळचा विसावा व दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन दुपारी लोणंद येथून निघून दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल तर मुक्काम तरडगाव (ता. फलटण) येथे होणार आहे.

मंगळवार, दि. ९ जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून प्रस्थान होईल. सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज, दुपारचे भोजन निंभोरे ओढा, दुपारचा विसावा वडजल व फलटण दूध डेअरी, रात्रीचा मुक्काम फलटण (विमानतळ) बुधवार, दि. १० जुलै रोजी सकाळी फलटण येथून प्रस्थान, सकाळचा विसावा विडणी, दुपारचे भोजन पिंपरद, दुपारचा विसावा निंबळक फाटा, रात्रीचा मुक्काम बरड येथे असेल.गुरुवार, दि. ११ जुलै रोजी बरड येथून प्रस्थान, सकाळचा विसावा साधबुवाचा ओढा, दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ, दुपारचा विसावा शिंगणापूर फाटा (पानसकर वाडी) येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश व रात्रीचा मुक्काम नातेपुते (जि. सोलापूर) येथे होईल.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये विशेष उपक्रम

Post Views: 43 कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये विशेष उपक्रम कर्करोगाविषयी असलेल्या शंकांचे निरसन करत तज्ज्ञांनी केले

Live Cricket