शिक्षक बँकेच्या वाटचालीत सेवकांचे योगदान मोलाचे श्री किरण यादव
सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या शंभर वर्षांच्या यशस्वी वाटचालीमध्ये बँकेत सेवा केलेल्या सर्व सेवानिवृत्त आणि कार्यरत सेवकांचे मोलाचे योगदान आहे. असे गौरवोद्गार बँकेचे चेअरमन श्री किरण यादव यांनी काढले. शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आजी-माजी सेवक सन्मान सोहळा आयोजित केला होता.यावेळी त्यांनी सेवकाबद्दल कृतज्ञता भावना व्यक्त केली.
यावेळी बोलताना किरण यादव म्हणाले विनम्र आणि जलद सेवेसाठी बँकेतील सर्व सेवक वर्ग नेहमीच तत्पर असतो. त्यामुळे सर्व सेवकांचा बँकेला नेहमीच अभिमान वाटतो. ज्या सेवकांनी बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत सेवावृत्तीने काम केले. त्यांच्या सेवेचा उचित गौरव व्हावा यासाठी सेवक सन्मान सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षक नेते संभाजीराव थोरात म्हणाले सेवानिवृत्त व कार्यरत सेवकांनी ग्राहक हा राजा समजून त्यांना विनम्र आपुलकीची सेवा दिली त्यामुळे शिक्षक बँक समाजातील सर्व घटकांमध्ये विश्वासू बँक म्हणून प्रसिद्ध झाली. तसेच शिक्षक बँकेच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे जीवनमान उंचावले हेही त्यांनी आवर्जून नमूद केले .
सेवकांनी नेहमी बँकेच्या प्रगतीचा विचार केला पाहिजे, संचालक मंडळाने निश्चित केलेली ध्येयधोरणे, योजना यांची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवली पाहिजे. स्पर्धेच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कामकाजामध्ये गतिमानता आणणे आवश्यक आहे. असे आवाहन करून उपस्थित सर्व सेवकांचे कौतुक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांनी केले.
यावेळी अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे संयुक्त सचिव दीपक भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून बँकेच्या सर्व सेवकांप्रती आदर असल्याचे सांगून सेवकांनी बदलत्या बँकिंगला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सेवक सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, माजी चेअरमन राजेंद्र बोराटे,विद्यमान व्हाईस चेअरमन शहाजी खाडे यांनी आपल्या मनोगतातून सेवकांनी 100 वर्षाच्या कालखंडात बँकेसाठी जे भरीव योगदान दिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी रामचंद्र साळुंखे यांनी सेवानिवृत्त सेवकांचा आदरपूर्वक सन्मान केल्याबद्दल चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाचे ऋण व्यक्त केले. तसेच सेवेत कार्यरत सेवकांनी इतर बँकांच्या कामकाजाची माहिती घेऊन जागरूकतेने सेवा देण्याच्या आवाहन केले. यावेळी कार्यालय अधीक्षक इकबाल काझी यांनी सेवकांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
या सेवक सन्मान सोहळ्यासाठी शिक्षक समितीचे जिल्हा नेते शंकर देवरे, विभागीय उपाध्यक्ष प्रदीप कदम, अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, माजी चेअरमन विठ्ठल माने, संतोष मांढरे, विठ्ठल फडतरे, विजयकुमार भुजबळ, रामदास जगताप, किसन खताळ, संजय बोबडे, बसप्पा दोडमणी संचालक नवनाथ जाधव ,शशिकांत सोनवलकर, सुरेश पवार, नितीन शिर्के, विजय ढमाळ, विशाल कणसे,तानाजी कुंभार ज्ञानबा ढापरे, संजय संकपाळ आणि सौ पुष्पलता बोबडे उपस्थित होत्या.
चेअरमन किरण यादव यांनी सेवकांना शताब्दी वर्षाच्या निमित्ताने एक ज्यादा वेतनवाढ देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्व सेवकांच्या वतीने चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ यांचे आभार मानण्यात आले.