जोतिर्लिंग गणेश मंडळ यांचे वतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना.
तांबवे – आणे ता.कराड येथील गणेशाची वाजत, गाजत,उत्साहात, ढोल ताशाच्या गजरात आणे गावचे आयपीएस तुषार देसाई आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर गायत्री देसाई एमबीबीएस एमडी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त तानाजी देसाई आणि वैशाली देसाई यांच्या हस्ते उभयतांचा सत्कार करण्यात आला, यावर्षी मंडळाला 35 वर्षे पूर्ण होत आहेत.
मंडळातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. लहान मुले, स्त्रिया यांच्यासाठी विविध खेळ ठेवले जातात, वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात, व्याख्यान आयोजित केले जाते. दहा दिवस मनोभावे गणेशाची पूजा केली जाते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अक्षय देसाई, उपाध्यक्ष अभिजीत देसाई, सचिव प्रशांत देसाई तसेच गणेश देसाई, सागर देसाई, धीरज देसाई, विशाल देसाई, शुभम देसाई, तानाजी देसाई, रुपेश देसाई असे मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
