नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांनी साजरा

श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांनी साजरा

श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांनी साजरा

सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये संस्था सचिव मा.तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रथम योग प्रशिक्षिका सौ मनीषा कदम व सौ सुनंदा जाधव यांनी मानवी जीवनातील योगाचे फायदे कथन केले तसेच सुदृढ शरीरासाठी योगाचे अनमोल महत्त्व सर्वांना पटवून दिले. त्यानंतर योग साधनेतील विविध आसनांचे प्रकार, प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक घेतले गेले. प्रत्येक आसन कसे करावे व कशासाठी करावे त्याचे आपल्या शरीरासाठी होणारे फायदे याविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षक वृंदही यामध्ये सहभागी झाला होता.

        योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील ‘इको क्लब’ व वृक्षारोपण समिती यांचे कडून ‘एक पेड माँ के नाम ‘हा उपक्रम राबवला गेला. त्यामध्ये इयत्ता पाचवीतील काही विद्यार्थी व त्यांच्या माता पालक यांच्या हस्ते विद्यालयाच्या पटांगणात वृक्षारोपण केले गेले आणि त्या झाडाचे संगोपन करण्याचे सर्व विद्यार्थ्यांनी ठरवले. या सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापक अमरसिंह वसावे पर्यवेक्षक यशवंत गायकवाड यांनी केले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket