श्रीपतराव पाटील हायस्कूलचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम वेळेकामथी येथे उत्साहात साजरा
सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल मार्फत सातारा तालुक्यातील वेळेकामथी या गावात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे नियोजन संस्था सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
वृक्षारोपण संपन्न झाल्यानंतर गावकऱ्यांमार्फत वृक्षारोपणासाठी उपस्थित असलेले श्रीपतराव पाटील हायस्कूलचे पर्यवेक्षक यशवंत गायकवाड व इतर सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. निसर्गसंपन्न अशा वेळेकामथी गावामध्ये वृक्षारोपण करताना गावकऱ्यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. चिंच, आवळा अशा विविध प्रकारची झाडे विद्यार्थी,शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने लावण्यात आली.
यावेळी वेळेकामथीचे सरपंच रुपेश चव्हाण तसेच विजय चव्हाण, अशोक पवार, विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रमोद चव्हाण आणि गावातील राजकारण, समाजकारण व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
