श्री दत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवार सातारला सामाजिक कार्य करण्यासाठी एनजीओ ची मान्यता – अध्यक्ष विलास काळे
सातारा :श्री दत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवार सातारला सामाजिक कार्य करण्यासाठी एनजीओ ची मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थां अध्यक्ष विलास काळे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
श्री दत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवार गेली अडतीस वर्षे होऊन अध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता श्री दत्त संस्थान अक्कलकोट स्वामीभक्त परिवाराच्या सेवाभावी संस्थेचा शुभारंभ मा.सुनील जाधव,सरकार वकील महेश कुलकर्णी,ऍड. जनार्दन करपे, शिवाजीराव भोईटे , दगडे महाराज, सुनील कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
त्याचबरोबर संस्थेच्या नवीन सभासदांना ओळखपत्र आणि संस्थेच्या कार्यांच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन केले जाणार असून गुरुदत्त कॉलनी कृष्णनगर सातारा येथे कार्यक्रम असून अक्कलकोट स्वामीभक्त परिवारांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
