शिवराष्ट्र नर्सिंग कॉलेजचे उपक्रम आदर्शवत: संकेत नवघणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वृक्षदिंडी काढून पर्यावरणाचा संदेश
कराड( ज्ञानेश्वर शेवाळे ) आषाढी एकादशीचे औचित्य साधून मौजे घोगाव(ता. कराड) येथील श्री संत कृपा मंदिर, शिवाजीनगर येथे पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. “वृक्षवेली आम्हा सोयरे , झाडे लावा -झाडे जगवा” हा संतांचा संदेश देत ही वृक्षदिंडी घोगाव परिसरातून काढण्यात आली. दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
या कार्यक्रमास संकेत नवघणे (विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालय), डॉ. इंद्रजीत जाधव (जनरल हॉस्पिटल, सातारा), पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे, जगन्नाथ नवघणे (नेव्ही अधिकारी), अतुल उभे (मुंबई पोलीस), अक्षय मोरे (युवा उद्योजक), प्रसाद नवघणे (पोलीस), शिवराष्ट्र नर्सिंग कॉलेजचे संस्थापक-अध्यक्ष संजय बजरंग भावके, मुख्याध्यापिका श्वेताली भावके, घोगाव ग्रामपंचायत सदस्य सुनंदा भावके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना संकेत म्हणाले की शिवराष्ट्र नर्सिंग कॉलेजने राबवलेलं उपक्रम खरोखरच आदर्शवत आहेत, माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपण समाजाला काहीतरी देणं लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवराष्ट्र नर्सिंग कॉलेजचे कार्य सुरू आहे.





