Home » राजकारण » शिवेंद्रसिंहराजेंनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले : श्रीमंत छत्रपती सौ.वेदांतिकाराजे

शिवेंद्रसिंहराजेंनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले : श्रीमंत छत्रपती सौ.वेदांतिकाराजे

शिवेंद्रसिंहराजेंनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले : श्रीमंत छत्रपती सौ.वेदांतिकाराजे

महानुभाव मठात दीपोत्सवानिमित्त दिली सदिच्छा भेट 

भुईंज ,(महेंद्रआबा जाधवराव ) :सातारा- जावली मतदारसंघात प्रत्येक गावात, वाडी- वस्तीत विकासाचा झंजावात करून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. समाजातील सर्व घटकांचे विविध प्रश्न, समस्या सोडवून त्यांनी प्रत्येक घटकाला, प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. 

सातारा येथील महानुभाव मठ येथे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमाला सौ. वेदांतिकाराजे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मठाधिपती हेमंतराज बिडकर उर्फ सातारकर बाबा, राजू बिडकर, महेंद्र बिडकर, तपस्विनी आशाताई बिडकर, रंजनाताई बिडकर, वेळापुरे, निलेश बिडकर, विकास देशमुख, महेंद्र गार्डे, अक्षय भोसले, शंकर भोसले, श्रेयश देशमुख यांच्यासह अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, शिवेंद्रसिंहराजेंनी महानुभाव पंथातील लोकांच्या विविध समस्या सातत्याने सोडवल्या आहेत. महानुभाव पंथच नव्हे तर, सर्वच समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे नेहमीच प्राधान्य देतात. मतदारसंघात विकासात्मक कामाबरोबरच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा आणि एकोपा जपण्याचे काम शिवेंद्रसिंहराजे करत आले आहेत. आगामी काळातही शिवेंद्रसिंहराजे महानुभाव मठातील लोकांच्यासह सर्व समाजाच्या सर्वप्रकारच्या समस्या सोडवतील, याची खात्री सर्वांनाच आहे. त्यामुळेच मतदारसंघातील जनता आणि समाजातील सर्व घटक शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीशी खंभीरपणे उभे आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपण सर्वांनी सोबत राहून शिवेंद्रसिंहराजेंना विक्रमी मताधिक्य द्यावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले. 

मठाधिपती बिडकर यांनी सौ. वेदांतिकाराजे यांचे यथोचित स्वागत केले. सौ. वेदांतिकाराजे यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket