Home » ठळक बातम्या » सर्वांसाठी माझ्या घराचे दरवाजे कायम उघडे आ.शिवेंद्रराजे

सर्वांसाठी माझ्या घराचे दरवाजे कायम उघडे आ.शिवेंद्रराजे

सर्वांसाठी माझ्या घराचे दरवाजे कायम उघडे आ.शिवेंद्रराजे

मताधिक्य देण्याचा निवृत्त शिक्षक संघटनेचा निर्धार 

भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )राजकारणात शब्दाला फार महत्व आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांचा वारसा आणि त्यांची कामाची पद्धत मी कायम अवलंबली आहे. मी कधीच दिलेला शब्द फिरवला नाही, दिलेला शब्द काहीही झालं तरी मी पाळतो. त्यामुळेच अगदी अबालवृद्धांपासून सर्वच लोकांचे माझ्याबद्दल आपुलकी आणि प्रेम आहे. शिक्षक हे माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेत. कोणाची कसलीही समस्या, प्रश्न असेल, गावातील, परिसरातील विकासकाम असेल मला कधीही सांगा मी तुमच्यासाठी वाट्टेल ते करीन. माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी कायम उघडे आहेत, असा शब्द आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. 

             सातारा- जावली मतदारसंघातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपस्थित सेवानिवृत्त शिक्षकांनी शिवेंद्रराजेंना आशीर्वाद देऊन त्यांना महाराष्ट्रात १ नंबर मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वजण स्वतः मतदान करू आणि इतर सर्वच मतदारांना मतदान करण्यासाठी सांगू, असा शब्द दिला. याप्रसंगी मछिंद्र मुळीक, बा. रा. गायकवाड, दत्तू पार्टे, आनंद मस्कर, संजय परदेशी, ल.गो. जाधव, सुरेश आंबवले, सुनील राजमाने, रमेश लोटेकर, सुरेश दुदुस्कर, आनंदा काकडे, महादेव निकम, ललिता बाबर, जागृती केंजळे, मनोहर कदम, शिवाजी कदम आदी उपस्थित होते. 

           आ. शिवेंद्रराजेंनी सर्वांचे आभार मानले. समाजातील महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक होय. आपल्या सारख्या जेष्ठ लोकांनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत. आपले आशीर्वाद मला लाख मोलाचे आहेत. आपण स्वतः मला मतदान करणार आहात आणि तुमच्या पाठिंब्यामुळे तुम्ही घडविलेली पिढी देखील विक्रमी मतदान करेल यात शंका नाही. आपल्या सर्वांची सेवा करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. यामध्ये कुठेही कधीही कसूर होणार नाही, असा शब्द आ. शिवेंद्रराजेंनी सर्वांना दिला

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 8 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket