शिवजयंती निमित्त शालेय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न
कराड – येथील बॅडमिंटन क्लब आयोजित शिवजयंती निमित्ताने शालेय बॅडमिंटन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे घेण्यात आल्या.यास्पर्धेचे उद्घाटन किशोर कुलकर्णी व राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले या स्पर्धेला 229 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली ही स्पर्धा 6 वयोगटात खेळवण्यात आली यामध्ये कराड तालुक्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला तसेच सर्व क्रीडा शिक्षकांनी यामध्ये मोलाची मदत केली स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
मुली 1 ली ते 4 थी गटात शरयू कदम, विभावरी कांबळे,मियारा मोरे व विभावरी गायकवाड.इयता 5 वी ते 7 वी गटात श्रद्धा इंगळे,अदिती आदमने,मानसी महाडिक व मिरा तोडकर.इयता 8 वी ते 10वी गटात देवांशी पाटील, आर्या देशमुख, गायत्री कदम व अनन्या पाटील
मुले गटात 1 ली ते 4 थी गटात विराज आरजूकडे,शौर्य पावसकर,गोयम मूथा व भार्गव पाटील .इयत्ता 5 वी ते 7 वी गटात कनक जोशी ,परम रसाळ ,शर्विल बानुगडे व चैत्र शहा.इयता8 वी ते 10वी राजवीरसिंह डूबल,अर्जुन जाधव,मनिष पाटील व पियूष पाटील यांनी यश संपादन केले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण ॲथलेटिक्स राष्ट्रीय कोच अतुल पाटील यांच्या हस्ते व किशोर कुलकर्णी,राहुल कुलकर्णी, निलेश फणसळकर,ओंकार पालकर, अतुल पाटील तुषार गद्रे प्रकाश गद्रे यांचे उपस्थित झाला.
