नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » देश » फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌‍ ऑफ वेस्टर्न रीजनच्या स्वीकृत सदस्यपदी शिरिष चिटणीस

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌‍ ऑफ वेस्टर्न रीजनच्या स्वीकृत सदस्यपदी शिरिष चिटणीस

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌‍ ऑफ वेस्टर्न रीजनच्या स्वीकृत सदस्यपदी शिरिष चिटणीस

पुणे-चित्रपटविषयक चळवळ गतिमान करण्यासाठी अनेक उपक्रम राबवणाऱ्या फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌‍ ऑफ वेस्टर्न रीजनच्या स्वीकृत सदस्यपदी ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि लेखक शिरिष चिटणीस यांची निवड करण्यात आली.

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌‍ ऑफ वेस्टर्न रीजनच्या पुण्यात झालेल्या मिटींगमध्ये ही निवड करण्यात आली.शिरिष चिटणीस हे ज्येष्ठ लेखक असून त्यांच्या दिपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून ते विवीध चित्रपटविषयक आणि साहित्यविषयक उपक्रम राबवत असतात.फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌‍ ऑफ वेस्टर्न रीजन या संस्थेच्या माध्यमातून आता अधिक चांगले उपक्रम राबवता येतील असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्‌‍ ऑफ वेस्टर्न रीजनच्या याच मिटींगमध्ये कार्यकारीणीचे 12 सदस्य व 7 स्विकृत सदस्यांची देखील निवड 2026-28 या कालावधिसाठी करण्यात आली.फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ वेस्टर्न रीजनच्या कार्यकारीणीवर निवड झालेल्या सदस्यांचा तपशील पुढील प्रमाणे :

किरण व्ही. शांताराम (अध्यक्ष), मुंबई, वीरेंद्र चित्राव (उपाध्यक्ष), पुणे, संदिप मांजरेकर (सचिव), मुंबई, दिलीप बापट (कोषाध्यक्ष), कोल्हापूर, जितेंद्र पाटील (विभागीय सचिव), लातूर, डॉ. सुनिल पुणतांबेकर (सदस्य), डोंबिवली, राजभूषण सहस्त्रबुध्दे (सदस्य), सातारा, हेमंत बेळे (सदस्य), नासिक, डॉ. नवनीत तोष्णीवाल (सदस्य), सोलापूर, विनित जोशी (सदस्य), जळगांव, राजेंद्र तालक (सदस्य), मडगांव-गोवा, ऋता धर्माधिकारी (सदस्य), नागपूर

स्विकृत सदस्य :

शिरीष चिटणीस, सातारा सतीश जकातदार, पुणे अमित चव्हाण, मुंबई सचिन चट्टे, पणजी-गोवा मयुर कुलकण, कोल्हापूर सुधीर मुळे, रत्नागिरी

कार्यालयीन सचिव :

प्रणव साळगांवकर, ठाणे  

या बैठकीत चित्रपट चळवळ जोमाने पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला. फिल्म सोसायटी चळवळीचा काळ हा आव्हानात्मक आहे,परंतू ओ.टी.टी. प्लॅटफॉर्ममुळे निराश झालेला रसिक आगामी काळात मोठ्या प्रमाणात पुन्हा आपल्या चळवळीकडे येईल यात शंकाच नाही. फिल्म सोसायटी चळवळ जास्तीत जास्त तरूणाभिमुख होईल या दृष्टीने प्रयत्न प्रयत्न करावे लागतील. त्या प्रमाणे कार्यक्रमांची रचना करावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यात पाच कॉलेज फिल्म क्लब हे आपले ध्येय असून त्यासाठी आपण पुढील 2 वर्षात कार्यरत राहण्याचा निश्चय करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket