सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » शेंदुरजणे तालुका वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते संपन्न

शेंदुरजणे तालुका वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते संपन्न 

शेंदुरजणे तालुका वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते संपन्न 

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या शाळेतून गुणवंत विद्यार्थी घडतील व विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवतील, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.

शेंदुरजणे तालुका वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, मॅप्रो फुड्सचे व्यवस्थापकीय संचालक मयूर वोरा, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे शाळेचे मुख्याध्यापक रामदास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

डोंगरी विकास निधीतून, विविध संस्थां व ग्रामस्थांच्या मदतीने उभारण्यात आलेली शाळेची इमारत गावाच्या वैभवात भर घालेल, असा विश्वास व्यक्त करून मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, शाळेतील विद्यार्थी हा ज्ञानाने व संस्काराने परिपूर्ण होण्यासाठी शिक्षक, पालक यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले पाहिजे. माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये चांगले शिक्षण देण्यात येत आहे. राज्य शासन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवित आहे. यामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, दुपारचे जेवण, विद्यार्थ्याला दुर्धर आजार असल्यास शासनामार्फत मोफत उपचार केले जातात. वाई जवळ असतानाही शेंदूरजणे प्राथमिक शाळेने पटसंख्या टिकविण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा चांगला ठेवला आहे. या डिजिटल युगात आपापसात संवाद खूप कमी होत आहे. हे लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या खेळांकडेही लक्ष दिले पाहिजे. यासाठी शेंदूरजणे येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.या कार्यक्रमात विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket