Home » राज्य » शिक्षण » सामान्य माणसाच्या कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाचे दरवाजे कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांनी खुले केले – शरदचंद्र पवार

सामान्य माणसाच्या कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाचे दरवाजे कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांनी खुले केले – शरदचंद्र पवार

सामान्य माणसाच्या कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाचे दरवाजे कर्मवीर भाऊराव पाटील आण्णांनी खुले केले  शरदचंद्र पवार

कराड प्रतिनिधी –सामान्य माणसाच्या कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करावेत यासाठी एक चांगलं काम आण्णांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी केले.

काले ता कराड येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालयाच्या नुतन इमारत उद्घाटन वेळी ते बोलत होते.यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, काॅग्रेसचे आमदार विश्वजित कदम, माजी खासदार श्रीनिवास पाटील,रयत संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, प्रभाकर देशमुख, सत्यजित पाटणकर व रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शरदचंद्र पवार साहेब म्हणाले अण्णांच्या डोळ्या समोर काही व्यक्ती आदर्श होत्या यामध्ये प्रामुख्याने महात्मा जोतिबा फुले ,राजश्री शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या सत्यशोधकीच्या चळवळीतून प्राकृतिक विचाराचा प्रसार करण्याचं काम आण्णांनी हाती घेतलं आपली जीवन रेखा म्हणून ते काम स्वीकारल. या कामात यश यायचं असेल त्या काळामध्ये मुले शिकली पाहिजे त्यांच्यासाठी शिक्षणाची दरवाजे खुले झाले पाहिजेत. ही भूमिका त्यावेळी अण्णांनी घेतली त्यासाठी त्याची सुरुवात काढले गावातून केली .कालेगाव हे स्वातंत्र्य चळवळीतील संघर्ष करणारे गाव होत .स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून हे ओळखलं जातं. हा परिसर लोक इतिहासाचा भाग झालेला आहे. या परिसरातील अनेक गावांमध्ये शेकडो स्वातंत्र सैनिकांनी त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी उभे राहिलेले आहेत . या गाव मध्ये 57 लोकांनी स्वातंत्र सैनिकांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्या संघर्षामध्ये सहभागी झाले. लोकांचे जागृती करणे ,सत्यशोधक विचार सांगणे ते लोकांच्या पर्यंत पोहोचवणं यासाठी अनेकांनी कष्ट घेतले होते . महात्मा गांधीनी या देशांमध्ये स्वातंत्र्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती.गांधीजीं म्हणायचे नुसतं इंग्रज जाऊन चालणार नाही तर लोकांचे जीवनामध्ये परिवर्तन करायचे असेल त्यासाठी विधायक कार्यक्रम घेतला पाहिजे. तो विधायक कार्यक्रम यशस्वी व्हायचा असेल तर शिक्षण देणे गरजेचे आहे. आणि त्या शिक्षणाचे महत्त्व महात्मा गांधी लोकांना सांगितलं त्यावेळी आण्णां हे गाधीजींच्या विचारान प्रेरित झाले आणि त्यांनी शिक्षणाच काम हाती घेतलं .अनेक गावांमध्ये तश गांधीजींच्या नावाने अनेक विद्यालय सुरू केली.यामध्ये कालेची ही शाखा सुद्धा आहे . महात्मा गांधी नावाने सन1918 एक ऑगस्टला सुरू झाली. आज पर्यंत उत्तम प्रकारचे काम या शाखेमध्येच सुरू आहे शिक्षण त्याचा विस्तार त्याची गरज आहे आज नवीन नवीन आव्हान येत आहेत त्यांना सामोर जायचं असेल तर शिक्षण गुणवत्ता आणि दर्जा वाढविणे गरजेचे आहे .‌

यावेळी रयत शिक्षण संस्थेचे अनिल पाटील, चेअरमन चंद्रकांत दळवी व विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.एन.डांगरे यांनी व आभार पाटील सर यांनी मानले.

काले गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य विकास पाटील यांनी यांनी एक पण केलं होतं की शाळेची इमारत पूर्ण बांध होत नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही आज शाळेची इमारत पूर्ण बांधून झालेली आहे ते आता दाढी करतील असं शरद पवार साहेबांनी त्यांचा सत्कार करता वेळी उपस्थितीना सांगितलं .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 79 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket