अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शहापूर विकास सेवा सोसायटी चा ठराव नाट्यमयरित्या आमदार मनोजदादा घोरपडे गटाकडे माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का

शहापूर विकास सेवा सोसायटी चा ठराव नाट्यमयरित्या आमदार मनोजदादा घोरपडे गटाकडे  माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का

शहापूर विकास सेवा सोसायटी चा ठराव नाट्यमयरित्या आमदार मनोजदादा घोरपडे गटाकडे 

माजी मंत्री बाळासाहेब पाटील गटाला धक्का 

कराड -मौजे शहापूर ता. कराड येथील विकास सेवा सोसायटी चा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक साठीचा ठराव आमदार मनोजदादा घोरपडे गटाकडे खेचण्यात आमदार गटाला यश आले. सदरचा ठराव चेअरमन सर्जेराव चव्हाण (भाऊ ) यांच्या नावे 8 विरुद्ध 4 अश्या मोठया फरकाने पारीत झाला.मागच्या पंधरा दिवसात व्यवस्थित मोर्चेबांधनी करून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री कारखान्याच्या शहापूर गावातच विकास सेवा सोसायटीचा ठराव मनोजदादा गटाकडे आणण्यासाठी दादांचे विश्वासू सहकारी आण्णासो जाधव, माजी उपसरपंच बाबा पाटील, कृष्णत शेलार (चेंडाभाऊ )युवा नेते दत्तात्रय शेलार यांनी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. 

        माजी चेअरमन दादा जाधव, राजाराम जगदाळे, शिवाजी जाधव फौंजी, आण्णा जाधव, प्रशांत जाधव, विष्णु शिरतोडे, भास्कर पाटील (दादा ),तानाजी जाधव(LIC) ,पोपट शिरतोडे, दर्शन जाधव, पृथ्वीराज चव्हाण, दुर्वास कुंभार, भानुदास पवार (तात्या ), गोरख शिंदे (तात्या) , शिवाजी सूर्यवंशी (आप्पा )निलेश शेडगे, तानाजी पाटील, चंद्रकांत नलवडे, समाधान पवार, प्रविण शिरतोडे, दत्ता भोसले, तानाजी जाधव, सुधिर चव्हाण, प्रमोद मुंद्रळकर, कृष्णत नामदास, राजेंद्र शेलार, अनिल जाधव, कृष्णत चव्हाण, सदाशिव शेलार, अमृत चव्हाण, दत्तात्रय जाधव, गोविंद पवार, प्रशांत जाधव, तानाजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने सोसायटीचे चेअरमन सर्जेराव चव्हाण (भाऊ ) यांच्या नावे ठराव घेण्यात आला. ठरवामुळे शहापूर गावातील मनोजदादा गटाला अधिक ऊर्जा मिळाली असुन माजी सहकारमंत्री गटाला जबरी धक्का बसला आहे. कमी कालावधीमध्ये आमदार मनोजदादा यांच्या माध्यमातून शहापूर च्या विकासासाठी जो विशेष निधी देण्यात आला त्यामुळेच शहापूरकरानी आमदार मनोजदादा यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा ठाम निर्णय घेतला. इथून पुढील काळामध्ये शहापूरकर आमदार मनोजदादांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील आणि मनोजदादांचे हात अजुन बळकट करतील असा विश्वास सोसायटीचे चेअरमन सर्जेराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

         ठराव झाल्यानंतर सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन आणि सर्व सदस्यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार मनोजदादांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. इथुन पुढच्या काळात शहापूर गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण दादांसोबत राहणार असल्याचे सांगत आजच्या ठरवाच्या निवडीमुळे मनोजदादा गटाला अधिक बाळकटी आल्याचे सांगितले. यावेळी आण्णा जाधव, निलेश शेडगे, दत्तात्रय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन करून पुढील काळात शहापूर च्या विकासासाठी निधी कमी पडुन देणार नसल्याचे आश्वासन दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket