ज्येष्ठ उद्योजक श्री.फरोख कूपर यांचा ‘आयकॉन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग’ पुरस्काराने सन्मान
सातारा -कूपर कार्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. फरोख नरिमन कूपर यांना द टाइम्स ग्रुपतर्फे प्रतिष्ठेचा ‘आयकॉन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शतकभराच्या औद्योगिक वारशाला नवे बळ देत भारतीय उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टता, नवोन्मेष आणि ओद्योगिक विकासासाठी दिलेल्या त्यांच्या अतुलनीय नेतृत्वाची दखल घेत हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला.
पुणे येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ईटी नाऊ मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर अवॉर्ड्स २०२६० सोहळ्यात देशभरातील नामवंत उद्योगपती, धोरणकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कृषी विषयाचे औपचारिक शिक्षण घेतलेले असतानाही आपली जिद्द, दूररष्टी आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर श्री. फरोख कूपर यांनी कूपर कॉर्पोरेशनला भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी व उत्पादन उद्योगांमध्ये स्थान मिळवून दिले. १९८४ साली त्यांनी सातारा एमआयडीसी येथे कमिन्स इंडियासाठी इंजिन लाइनर्स निर्मितीचा फाउंड्री प्रकल्प सुरू करून कंपनीच्या विकासाचा भक्कम पाया रचला. त्यानंतर १९९० च्या दशकातील आर्थिक उदारीकरणातून निर्माण झालेल्या संधींचा वेध घेत उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान आणि गुणवत्ता यांचा सातत्याने विकास करत कूपर कॉर्पोरेशनला जागतिक स्तरावर विश्वासार्ह अभियांत्रिकी ब्रँड म्हणून ओळख निर्माण करून दिली.
आज त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली कूपर कॉर्पोरेशन सायलेंट व इंथन कार्यक्षम इंजिन्स, जागतिक दर्जेदार जनसेट्स, उच्व दवि इंजिन कॉम्पोनन्ट्स आणि ट्रॅक्टर्स यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असून गुणवत्ता, नाविन्य, शाश्वत विकास आणि ग्राहक समाधानाचे नवे गापदंड प्रस्थापित करत आहे. कूपर कॉर्पोरेशनच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्क्यांहून अधिक उत्पादने अमेरिका, युनायटेड किंगडम (यूके), जर्मनी, फिनलंड, जपान आदी देशांमध्ये निर्यात केली जातात. उद्योग विकासाबरोबरच सातारा जिल्ह्याच्या प्रगतीसाठीची त्यांची बांधिलकी, कर्मचाऱ्यांच्या विषयी, आत्मीयता आणि समाजाभिमुख कार्यामुळे त्यांना उद्योगक्षेत्रासह समाजातही विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
‘आयकॉन ऑफ मॅन्युफॅक्वरिंग’ हा पुरस्कार उत्पादन क्षेत्रात नाविन्य, उत्कृष्टता, शाश्वत विकास आणि परिवर्तनशील नेतृत्वाद्वारे उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योगनेत्यांना प्रदान केला जातो. श्री. फरोख कूपर यांना तांत्रिक प्रगती, धोरणात्मक नेतृत्व, गुणवत्ता आणि भारतीय उत्पादन क्षेत्राला दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल हा सन्मान बहाल करण्यात आला. तसेच , मध्ाम उद्योग गटामध्ये ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट २०२६’ हा पुरस्कारही कूपर कॉपरिशनला प्रदान करण्यात आला. संस्थेतील प्रभावी मानव संसाधन व्यवस्थापन, कर्मचारी विकास, कौशल्यवृद्धी, प्रशिक्षण, कर्मचारी सहभाग आणि सक्षम कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्या उल्लेखनीय उपक्रमांची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात श्री. फरोख कूपर म्हणाले, “नेता म्हणून तुम्ही भविष्याचा वेध घेतला पाहिजे. इतरांना जे दिसत नाही ते तुम्ही पाहिले पाहिजे आणि त्यानुसार पुढे वाटचाल करत नेतृत्व केले पाहिजे.
हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आणि भारतीय उत्पादन उद्योगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव आहे. या यथोचित सन्मानाबद्दल कूपर कॉर्पोरेशनतर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि संस्थेला आणखी मोठ्या यशाच्या शिखरापर्यंत नेण्याच्या वाटचालीस निरंतर शुभेच्छा.





