सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेच्या व्हा. चेअरमनपदी डॉ. कांत फडतरे यांची निवड
सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सहकार भूषण धन्वंतरी नागरी सह. पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन पदी डॉ. कांत फडतरे यांची अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक श्री. संजय जाधवसो यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मा. संचालक मंडळाच्या सभेमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली.याप्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले, डॉ. कांत फडतरे यांना यापूर्वीचा उत्तम कामकाजाचा अनुभव आहे. धन्वंतरी पतसंस्थेस जास्तीत जास्त वेळ देउन व सर्व संचालकांना विश्वासात घेउन ते काम करतील व संस्थेचे कामकाजाला न्याय देवून आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडतील. तसेच मावळते व्हा. चेअरमन डॉ. शिरीष भोईटे यांनीही त्यांच्या कार्यकालात धन्वंतरी पतसंस्थेचे उत्तम कामकाज करुन पतसंस्थेची प्रगतीपथावरील वाटचाल पुढे चालू ठेवली त्यांच्या कार्यकालात त्यांनीही अपेक्षेप्रमाणे कामकाज केलेले आहे त्यांनी केलेल्या समाधानकारक कामकाजाबदद्ल डॉ. शिरीष भोईटे यांचेही त्यांनी आभार मानले.
यावेळी नवनिर्वाचित व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांचा सत्कार अध्यासी अधिकारी मा. सहायक निबंधकसो श्री. संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराप्रसंगी डॉ. कांत फडतरे म्हणाले की, माझी व्हा. चेअरमनपदी निवड केल्याबदद्ल मा. संचालक मंडळाचा मी आभारी आहे. माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे तसेच माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्याला न्याय देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन. डॉ. रवि भोसले व सर्व संचालक मंडळाच्या मागदर्शनाने व सर्व सेवक वर्गाच्या सहकार्याने मी उत्तम काम करेन. मावळते व्हा. चेअरमन डॉ. शिरीष भोईटे यांनी याप्रसंगी सचालक मंडळाने केलेल्या सहकार्याबदद्ल आभार मानले ते पुढे म्हणाले की, सर्वाना सोबत घेवून कामकाज केले त्यामुळेच उत्तम कामकाज करता आले यापुढेही आपण सर्वजण असेच कामकाज करुन आपली संस्था आदर्श संस्था आहेच ती कायम आदर्श राखूया. तसेच नुतन व्हा. चेअरमन डॉ. फडतरे यांना सर्वाचे उत्तम सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली व त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांनी स्वागत व आभार मानले. याप्रसंगी संचालक डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. नारायण तांबे, डॉ. सौ. सारीका मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीहरी डिंगणे व अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होते. नवनिर्वाचीत व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.