गौरीशंकर फार्मसीच्या चौदा विद्यार्थ्यांची नामवंत कंपनीत निवड
लिंब- गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाविद्यालय, लिंब. येथे राष्ट्रीय स्तरावरील कार्यरत असलेली ऑजिओ फार्मास्युटिकल प्रा.लि. कंपनी, पुणे यांनी आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्यू मधून गौरीशंकर बी फार्मसी, लिंब च्या १४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या विद्यार्थ्यांची निवड करताना औषधनिर्माण शास्त्र शाखेतील सखोल ज्ञान व कौशल्ये याचबरोबर प्रभावी संवाद व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व या निकषाच्या आधारे निवड करण्यात आली असल्याची माहिती कंपनीचे एच आर मॅनेजर विश्वनाथ पाटोळे यांनी दिली. या निवड समितीमध्ये कंपनीचे प्लेसमेंट मॅनेजर राहुल आरे व संतोष स्वामी यांचा समावेश होता.
संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन उचित सत्कार केला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष बेल्हेकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा. दुधेश्वर शिरसागर, प्रा. प्राजक्ता कोळी,प्रा.गौरी इथापे,रजिस्ट्रार निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.कॅम्पस इंटरव्यू यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने परिश्रम घेतले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे,आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक व आभार प्रा. गौरी इथापे यांनी केले.
स्पर्धात्मक युगात गुणात्मक व दर्जात्मक शिक्षणाबरोबरच इंटरव्यू टेक्निकची ज्ञान कौशल्ये विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांच्या उज्वल करिअरसाठी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, लिंब महाविद्यालयात स्वतंत्रपणे इंटरव्यू टेक्निक मार्गदर्शन सेलची निर्मिती केली आहे.विविध क्षेत्रातील तज्ञाच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना विनामूल्य देण्यात येतो. त्यामुळेच असंख्य विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीत नोकरी करण्याची संधी प्राप्त होत आहे.
मदनराव जगताप,अध्यक्ष गौरीशंकर नॉलेज सिटी, सातारा.




