Home » Uncategorized » क्राईम डायरी » साताऱ्यातील दोघांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर अत्याचार

साताऱ्यातील दोघांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर अत्याचार 

साताऱ्यातील दोघांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर अत्याचार 

सातारा:  साताऱ्यातील दोन जणांनी संपूर्ण देशाची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य केले आहे. या दोघांनी थायलंडमध्ये एका तरुणीवर बलात्कार अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोन जण थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते. थायलंड  येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर  या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे. या घटनेचा आणखी तपशील समोर आलेला नाही. मात्र, या घटनेमुळे सातारकरांची मान शरमेने खाली गेली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket