अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » सातार्‍यात खा.संजय पाटलांचा निषेध एसपींना निवेदन: गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी

सातार्‍यात खा.संजय पाटलांचा निषेध एसपींना निवेदन: गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी

सातार्‍यात खा.संजय पाटलांचा निषेध एसपींना निवेदन: गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी

सातारा –पत्रकारांना धमकी दिल्‍याप्रकरणी शिवसेनेत प्रवेश केलेले खा. संजय दिना पाटील यांचा सातार्‍यातील पत्रकारांनी जाहीर निषेध नोंदवला. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना भेटून खा. संजय पाटील यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्याची मागणी केली.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या पुणे विभागीय अधिस्‍वीकृती समितीचे अध्‍यक्ष तथा सातारा जिल्‍हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, मार्गदर्शक विनोद कुलकर्णी या दोघांच्या सूचनेनुसार सातारा जिल्‍हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषदेच्यावतीने निवेदन देण्यात आले.

सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनी एसपी निखिल पिंगळे यांना घडलेल्‍या घटनेची माहिती दिली. खा.संजय दिना पाटील यांनी दि. २५ जून रोजी पत्रकारांबद्दल अपशब्द वापरुन थेट धमकी दिली. हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला आहे. पत्रकारांबद्दल केलेले वक्‍तव्‍य निंदनीय आहे. यामुळे सातार्‍यातील पत्रकारांच्यावतीने जाहीर निषेध व्‍यक्‍त करत त्‍यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष सनी शिंदे, डिजिटलचे अध्यक्ष प्रतीक भद्रे, पत्रकार संघाचे पदाधिकारी ज्ञानेश्‍वर भोईटे, उमेश बांबरे,अली मुजावर, अमित वाघमारे, अजित जगताप, पद्माकर सोळवंडे, प्रवीण शिंगटे, विनीत जवळकर, संदीप राक्षे, रिझवान सय्यद, जावेद खान, प्रमोद इंगळे, संजय शिंदे, गौरी आवळे, मीना शिंदे, अभिजीत माने, सचिन सापते, पलाश जवळकर, आर.डी.भोसले, मंगेश कुंभार, स्‍वप्‍नील गवाळे, विश्वास शेडगे तसेच छायाचित्रकार, पत्रकार उपस्‍थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket