शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » राज्य » शेत शिवार » साताऱ्यात गुरुवारी ज्ञानकोशकार प्रथम मराठी साहित्य संमेलन लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्था व केतकर कुल महासभेतर्फे आयोजन

साताऱ्यात गुरुवारी ज्ञानकोशकार प्रथम मराठी साहित्य संमेलन लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्था व केतकर कुल महासभेतर्फे आयोजन

साताऱ्यात गुरुवारी ज्ञानकोशकार प्रथम मराठी साहित्य संमेलन लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्था व केतकर कुल महासभेतर्फे आयोजन

सातारा : येथील ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्था व केतकर कुल महासभा यांच्यातर्फे ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर प्रथम मराठी साहित्य संमेलन गुरुवार दिनांक १८ जून २०२६ रोजी लोकमंगल हायस्कूल नागेवाडी-कुशी सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य शाम भुर्के यांची निवड करण्यात आली असून प्राध्यापक देवानंद सोनटक्के उद्घाटक आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिरीष चिटणीस आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश केतकर, विनोद कुलकर्णी, स्वप्निल पोरे उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात प्रारंभी सकाळी साडेआठ वाजता शालेय विद्यार्थ्यांना भावलेले ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर या विषयावर विद्यार्थ्यांची मनोगते सादर होणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेनऊ ते साडेदहा या कालावधीमध्ये डॉक्टर केतकर यांची बालकाप्रती संवेदना या विषयावर डॉक्टर माधुरी सहस्त्रबुद्धे, कोकणचे बुद्धीवैभव या विषयावर प्रकाश देशपांडे आणि मुकुंद फडके यांचे भाषण होणार आहे. सकाळी १०.३० ते १२.०० या कालावधीमध्ये उद्घाटन समारंभ होणार असून यावेळी ईशस्तवन माधवी केतकर सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय केतकर करतील. दुपारी बारा वाजता केतकर ज्ञानपीठ संवादमंच या विषयावर परिचर्चा होणार असून त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय केतकर असणार आहेत. त्यावेळी प्रमुख उपस्थिती सौ. आरती जव्हेरी, सुधाकर जोशी, दिलीप अनगळ, राजीव केतकर यांची असणार असून डाॅ. अनुजा कुलकर्णी, सौ. नीलिमा नातू, मिलिंद केतकर, सतीश केतकर आणि प्रवीण श्रीराम देशमुख (कल्याण) हे संवाद साधणार आहेत. दुपारी सव्वा दोन वाजता कवी संमेलन होणार असून त्याचे सूत्रसंचालन स्वप्निल जोशी करणार आहेत त्या संमेलनामध्ये बाबा ठाकूर, संजय चाचड, मंजुषा आचरेकर, प्रज्ञा लाटकर, लता कोंडे, आरती माने सहभागी होणार आहेत. तीन वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्याचे सूत्रसंचालन सुजाता हाटकर करणार आहेत.

यावेळी अजय आचरेकर, प्रकाश केतकर, दीपक जव्हेरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी नाट्य प्रवेश गीता भुर्के, सुगंधा दातार, स्मिता इंगलगावकर सादर करतील. दुपारी चार वाजता संमेलनाचा समारोप होणार असून यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य शाम भुर्के मनोगत व्यक्त करतील तसेच लोकमंगल समूहाचे शिरीष चिटणीसही मनोगत व्यक्त करतील सर्वानी या संमेलनाला उपस्थित रहावे असे आवाहन लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस, प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत जमदाडे, शिक्षक शशिकांत जाधव, नितीन कसबे, राहुल घोडके, रमेश माहुलकर यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket