Post Views: 299
साताऱ्यात ‘प्रसन्न डेंटल क्लिनिक’चे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन
सातारा प्रतिनिधी-पोवई नाका, सातारा येथे डॉ.प्रसन्न शिंदे यांच्या ‘प्रसन्न डेंटल क्लिनिक’ चे भव्य उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी डॉ.अजय घाडगे, उद्योजक शशांक शहा, डॉ. घोरपडे, प्रमोद शिंदे तसेच विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मित्रपरिवार, आप्तेष्ट व शुभेच्छुकांनी या प्रसंगी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
‘प्रसन्न डेंटल क्लिनिक’मार्फत साताऱ्यातील नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुणवत्तापूर्ण व अत्याधुनिक दंतोपचार सेवा उपलब्ध होणार आहेत.डॉ.प्रसन्न शिंदे यांच्या या नव्या उपक्रमासाठी उपस्थितानीं अभिनंदन करून त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
