साताऱ्यात प्रथमच श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक सेंटर मध्ये अद्यावत सोनोग्राफी मशीन दाखल
सातारा प्रतिनिधी -श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक सेंटर सातारा” येथील शाखेत अद्ययावत अशी सॅमसंग व्ही 8 कंपनीची सोनोग्राफी मशीन दाखल झाली आहे या सोनोग्राफी मशीनच्या साह्याने ऍडव्हान्स तपासण्या करण्यात येणार आहे जसे की पूर्वी *लिव्हर फायब्रो स्कॅन ( इलास्टोग्राफी )* ही सोनोग्राफी करण्यासाठी पुणे किंवा कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. त्यासाठी रुग्णांचा बराच वेळ व पैसा खर्च होत होता आता रुग्णांना श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक सेंटरच्या साह्याने ही तपासणी सातारा मध्ये करता येणार आहे तसेच या तपासणीचा खर्च अतिशय अल्प दरात रुग्णांना उपलब्ध करून दिला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या “श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक सेंटरमध्ये” एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध आहेत जसे की, 3t फीचर mri /32स्लीस सिटीस्कॅन/ हायटेक अल्ट्रासाउंड/ डिजिटल एक्स-रे /पॅथॉलॉजी /ओपीजी. ई अशा अद्ययावत तपासण्या एकाच ठिकाणी होतात त्यामुळे रुग्णांचा बराच वेळ व खर्च वाचतो. तसेच या ठिकाणी राष्ट्रीय बाल सुरक्षा केंद्रामार्फत गरीब मुलांना (शून्य ते अठरा) वयोगटातील मोफत तपासण्या करण्याचे कार्य सेंटर तर्फे करण्यात येते अशी माहिती संस्थेचे संचालक डॉक्टर अनिरुद्ध जगताप व श्री निलेश बळी यांनी दिली.
