Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » किरण पाटील(सर )यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर

किरण पाटील(सर )यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर

किरण पाटील(सर )यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर

सातारा : गणिताची भीती दूर करून विद्यार्थ्यांना लहान वयातच गणितात पारंगत बनविण्याचे उल्लेखनीय कार्य करणारे किरण पाटील यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सक्सेस अबॅकस साताराच्या माध्यमातून किरण पाटील यांनी मुलांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण करत आत्मविश्वास वाढविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. अबॅकस प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती व गणितीय कौशल्य विकसित होत असून, अनेक विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात सक्सेस अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे कार्य सुरू असून, या उपक्रमातून शेकडो युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच रोजगारनिर्मितीतही त्यांचे योगदान लक्षणीय मानले जात आहे.

त्यांच्या या बहुमोल कार्याचा गौरव म्हणून सातारा मीडिया सेवन यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “सातारा प्राईड 2026” पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीत किरण पाटील यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket