अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » दत्ताशेठ बांदल यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर

दत्ताशेठ बांदल यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर

दत्ताशेठ बांदल यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर

पाचवड (सातारा) : नमकीन व स्नॅक्स उत्पादन क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या श्री कैलाश फूड इंडस्ट्रीजचे प्रमुख उद्योजक दत्तात्रय शिवाजी बांदल (दत्ताशेठ बांदल) यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

एका छोट्या उद्योगातून सुरू झालेला कैलाश फूड्सचा प्रवास आज महाराष्ट्रातील नामांकित नमकीन उत्पादक म्हणून ओळखला जातो. बांदल परिवाराच्या नेतृत्वाखाली या उद्योगाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आपले भक्कम व्यावसायिक जाळे निर्माण केले आहे.

कैलाश फूड्समध्ये पारंपारिक चव आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून विविध खाद्यपदार्थ तयार केले जातात. मिक्स फरसाण, लसूण मिक्स, मद्रास मिक्स, विविध शेव, भडंग भेल, उपवास व फराळी चिवडा, बटाटा वेफर्स, आलू भुजिया, शेंगदाणा चिक्की, पेढा, कलाकंद, बासुंदी तसेच पाणीपुरी व पावभाजी मसाल्यासारखे रेडी-टू-मिक्स मसाले ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेषतः त्यांच्या बासुंदीला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

उत्पादनातील स्वच्छता, दर्जा आणि मसाल्यांची नैसर्गिक चव ही कंपनीची ओळख बनली आहे. सातारा जिल्ह्यासह पुणे व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे मजबूत वितरण जाळे असून, या उद्योगामुळे स्थानिक ग्रामीण भागातील ५० ते १०० हून अधिक लोकांना, विशेषतः महिलांना, रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

त्यांच्या या यशस्वी उद्योजकीय कार्याची दखल घेत सातारा मीडिया सेव्हन यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “सातारा प्राईड 2026” पुरस्कार दत्ताशेठ बांदल यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीबद्दल उद्योग व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket