सातारा नगरीचे लोकप्रिय नगरसेवक रवींद्रभैया ढोणे वाढदिवस विशेष
सातारा -मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावान सहकारी सातारा नगरपालिकेचे नगरसेवक छत्रपति शिवेंद्रसिंहराजे मित्र समूहाचे अध्यक्ष तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मा.रविंद्र (भैय्या) ढोणे यांचा आज वाढदिवस.
एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय नेत्याचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयात मा.रवींद्रभैय्या ढोणे यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. समृद्ध राजकारणाचा आणि कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याचे कौशल्य त्यांनी दाखवून दिले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या रवींद्रभैय्या यांनी मंत्री मा.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वात वार्डामध्ये अनेक विकास कामांचा डोंगर उभारण्याबरोबरच वॉर्डाचा चेहरा मोहरा बदलला आहे. सर्वसामान्य जनतेशी असणारी नाळ, कष्ट करण्याची जिद्द यामुळे सातारा नगरपालिकेत तरुण नगरसेवक म्हणून त्यांची छाप दिसून येत आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे असे आहे.
रविंद्रभैया यांना मी तसं पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे.
निवडणुका असो अथवा सामाजिक उपक्रम रविंद्रभैय्या यांनी परफेक्ट मॅनेजमेंटचा पाठ दाखवून दिला आहे.अचूक निर्णय क्षमता आणि त्यांच्या एका हाकेस हजारो युवकांची फळी त्यांच्या पाठीशी जमा होणारे, जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहता सातारा नगरपालिकेमधील आश्वासक तरुण चेहरा ठरतील.
शहराचे सर्वाचे लाडके नगरसेवक, रवींद्रभैया ढोणे आपल्याला जन्मदीवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
अली मुजावर, सातारा




