Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमृतमहोत्सवी वर्षाचा बुधवारी सांगता सोहळा समारंभ

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमृतमहोत्सवी वर्षाचा बुधवारी सांगता सोहळा समारंभ

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमृतमहोत्सवी वर्षाचा बुधवारी सांगता सोहळा समारंभ

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती

प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. १५ ऑगस्ट २०२३ ते १५ ऑगस्ट २०२४ या काळात “गौरवशाली अमृत महोत्सव वर्ष “बँकेने साजरे केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित केला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीनकाका पाटील यांनी दिली.

सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण, कृषी, सहकारी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे केंद्रस्थान असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारे प्रमाणे बँकिंग सेवेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास व प्रगती साधली आहे.

बुधवार, दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री, आमदार शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, विद्याधर अनास्कर, खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. राजेंद्र सरकाळे, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, आमदार मकरंद जाधव (पाटील)या प्रमुख मान्यवरांसह बँकेचे सर्व संचालक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमास विकास सोसायटी संचालक, शेतकरी, सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीनकाका पाटील यांनी केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 10 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket