Home » Uncategorized » सातारा जिल्हा – भाजपा तर्फे अपक्षांच्या भ्रामक प्रचारावर कठोर इशारा; फक्त एबी फॉर्मधारकांनाच अधिकृत उमेदवारी

सातारा जिल्हा – भाजपा तर्फे अपक्षांच्या भ्रामक प्रचारावर कठोर इशारा; फक्त एबी फॉर्मधारकांनाच अधिकृत उमेदवारी

सातारा जिल्हा – भाजपा तर्फे अपक्षांच्या भ्रामक प्रचारावर कठोर इशारा; फक्त एबी फॉर्मधारकांनाच अधिकृत उमेदवारी

सातारा जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचे जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. पक्षाने स्पष्ट केले आहे की भाजपकडून अधिकृत एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांनाच पक्षाचे अधिकृत उमेदवार मानले जाईल.

तथापि, काही ठिकाणी पक्षाकडून उमेदवारी न मिळालेल्या व्यक्तींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून त्यांच्या प्रचार साहित्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावरील वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले आहे. हा प्रकार थेट पक्षाच्या धोरणाच्या विरोधात असल्याचे भाजपने नमूद केले आहे.

यासंदर्भात पक्षाने कठोर भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला आहे की—

अधिकृत उमेदवारांखेरीज कोणत्याही अपक्षाने किंवा इतर पक्षीय व्यक्तींनी भाजपचे नेते, पक्षाचे नाव, चिन्ह किंवा त्यास साधर्म्य असलेले कोणतेही दृश्य घटक वापरून भ्रामक प्रचार केल्यास,निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, तसेच पक्षाच्या शिस्तभंग कार्यवाहीनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

भाजपने पुढे सांगितले की पक्षाचे नाव, चिन्ह तसेच वरिष्ठ नेत्यांचे छायाचित्र वापरण्याचा अधिकार फक्त अधिकृत उमेदवारांनाच आहे.सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी याबाबत सतर्क राहावे, तसेच कुठेही नियमभंगाचे प्रकार आढळल्यास त्वरित जिल्हा कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कळावे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे

रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (रोहास), जिल्हा

Live Cricket